अनेकदा ठरवतो सांगावं, पण काहीच सुचत नाही तू समोर आल्यावर
सरळ भाषेत सांगायचं तरी कसं माझं प्रेम आहे तुझ्यावर
मला कधीच जमलं नाही काव्यात्मक बोलणं.. कदाचित माझा अपूर्ण आहे शब्दकोश
मला मात्र एवढं कळतं, मी प्रेम केलंय .. यात माझा तरी काय दोष ?
प्रश्न आहे सांगायचं कसं म्हणून ठरवलंय पत्र लिहणार
बर्याच दिवसात काही लिहलं नाहीये, माझं अक्षर तिला कळणार ?
म्हणून ठरवलंय उद्या प्रेमदिन आहे .. तेव्हाच नारळ फोडावं
जे व्हायचं ते होणार.. मी आपलं बोलणं का सोडावं?
तिच्या मनात काय तिलाच ठाऊक.. निर्णय घ्यायचा तो ती घेणार
मी मात्र आपल्या मनातलं प्रामाणिक पणे सांगणार
आता मात्र मनावर वेगळाच दडपण आलंय
मला माझ्या मनाच कळेनासा झालंय
कधी वाटतंय कि तुझ्या प्रेमात मी आंधळा झालोय
आणि न बघता खूप दूरवर चालून गेलोय
एकीकडे तिचा होकार ऐकण्यास जीव आसुसुलाय
आणि मी खरच प्रेमात आहे ना हा प्रश्न मनाला पडलाय
प्रेमाचा अनुभव नसल्यामुळे खरं काय ते कळत नाही
मनातलं ओळखण्याचं पुस्तक सुद्धा कुठे मिळत नाही
लोक म्हणतात मला कि तू आमचा चेहरा वाचतो
परंतु स्वताचा चेहरा आरशात बघून मी स्वत फसतो
आता तूच सांग मला कि तुला काय वाटतंय
माझ्या वागण्यातून तुला खरच प्रेम जाणवतंय ?
खरंच जर सखे मी तुझ्या प्रेमात पडलोय
दिसेल माझ्या डोळ्यात कि मी तुझ्या साठी घडलोय
माझ्या डोळ्यातील भाव जर वाचू शकलीस बरोबर
मग तुलाच कळेल किती प्रेम करतो मी तुझ्यावर !
Contents on this page is the property of Mr. Prasad S. Hastak Copyright ©2008-2021
All rights reserved